क्राईम न्युज

वेश्या व्यवसाय चालणाऱ्या घरावर छापेमारी. 03 जनाविरुद्ध गुन्हा दाखल. पोलीस ठाणे औसा ची कारवाई

मुख्य संपादिका बालिका निरगुडे

वेश्या व्यवसाय चालणाऱ्या घरावर छापेमारी. 03 जनाविरुद्ध गुन्हा दाखल. पोलीस ठाणे औसा ची कारवाई

याबाबत अधिक माहिती अशी की, औसा शहरातील याकतपूर रोड परिसरातील लक्ष्मी निवास घरामध्ये औसा पोलिसांनी दिनांक 07 जून 2025 रोजी कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान रात्री 9 वाजण्याच्या सुमारास अचानक छापा मारला तेथे इसम नामे

1) महादेव बालाजी कांबळे, वय 21 वर्ष, राहणार मातोळा तालुका औसा.

2) नागनाथ नारायण कारले, वय 21 वर्ष, राहणार जयनगर, तालुका औसा.

3) दाऊद दगडू शेख, वय 24 वर्ष, राहणार दावतपूर तालुका औसा.

असे मिळून सदरील घरामध्ये महिलांना आणून वेश्यागमनासाठी गिऱ्हाईक आणून वेश्या व्यवसाय चालवीत असताना मिळून आले. त्यामुळे वेश्याव्यवसाय चालविणाऱ्या नमूद तीन आरोपी विरुद्ध पोलीस ठाणे औसा येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर प्रकरणी वेश्या गमनासाठी आणलेल्या महिलेची सुटका करण्यात आली आहे तर घरामध्ये वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या 03 आरोपीतांविरुद्ध पोलीस ठाणे औसा येथे गुन्हा दाखल करण्यात आला.सदर प्रकरणी वेश्या गमनासाठी आणलेल्या महिलेची सुटका करण्यात आली आहे तर घरामध्ये वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या 03 आरोपीतांविरुद्ध पोलीस ठाणे औसा येथे गुन्हा दाखल करण्यात आला.

सदरची कारवाई पोलिस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे, औसा उपविभागीय पोलीस अधिकारी कुमार चौधरी यांचे मार्गदर्शनात, औसा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील रेजीतवाड, पोलिस उपनिरीक्षक संतोषकुमार खोत, पोलीस अमलदार रामकिशन गुट्टे, रतन शेख, योगेश भंडे, महिला पोलिस अंमलदार शेख यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??