श्री क्षेत्र ज्ञानेश्वर महाराज, आळंदी आषाढी वारीच्या अनुषंगाने समन्वय बैठक”
मुख्य संपादिका बालिका निरगुडे

“श्री क्षेत्र ज्ञानेश्वर महाराज, आळंदी आषाढी वारीच्या अनुषंगाने समन्वय बैठक“
दिनांक १९/०६/२०२५ ते ०६/०७/२०२५ या दरम्यान साजऱ्या होणाऱ्या श्री. क्षेत्र ज्ञानेश्वर महाराज, आळंदी आषाढी वारीचे अनुषंगाने आज दिनांक ०५/०६/२०२५ रोजी पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त मा. श्री. विनयकुमार चौबे (भा.पो.से.) व श्री क्षेञ ज्ञानेश्वर महाराज देवस्थान, आळंदी विश्वस्त समितीचे सदस्य यांचेमध्ये पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालय येथे समन्वय बैठक पार पडली.
सदर बैठकी दरम्यान वाहतुक व्यवस्था, पार्किंग, गदीचे नियोजन, मनुष्यबळाचा योग्य वापर तसेच गुन्हेगारी नियंत्रणाकरीता आवश्यक उपाययोजना इ. बाबत पिंपरी चिंचवड शहर पोलीस आयुक्त, श्री. विनयकुमार चौबे यांनी मार्गदर्शन करुन योग्य रितीने अंमलबजावणीबाबत सुचना दिल्या.
समन्वय बैठकीस पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त श्री. विनयकुमार चौबे, श्री. सारंग आव्हाड, अपर पोलीस आयुक्त, डॉ. श्री. शिवाजी पवार, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ३. श्री. बापु बांगर, पोलीस उप आयुक्त (वाहतूक), श्री. राजेंद्रसिंग गौर, सहा. पोलीस आयुक्त (चाकण विभाग), श्री. भिमराव नरके, वपोनि आळंदी पोस्टे, पोनि. सतिश नांदुरकर, आळंदी वाहुतक विभाग तसेच श्री. क्षेत्र ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे प्रमुख विश्वस्त, श्री. योगी निरंजननाथ गुरु शांतीनाथ महाराज, पालखी प्रस्थान सोहळयाचे प्रमुख डॉ. भावार्थ देखणे, श्री. ज्ञानेश्वर महाराज संस्थनाचे प्रमुख व्यवस्थापक श्री. ज्ञानेश्वर वीर, विश्वस्त अॅड. श्री. राजेंद्र उमाप, ह.भ.प. चैतन्य महाराज लोंढे, ह.भ.प. श्रीमहंत पुरुषोत्तम महाराज मुरलीधर पाटील, अॅड. डॉ. रोहीणी पवार इ. अधिकारी व विश्वस्त उपस्थित होते.