क्राईम न्युज

12 लाख 98 हजार रुपयांची प्रतिबंधित सुगंधित तंबाखू वाहनासह जप्त. 02 व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल. पोलीस ठाणे किल्लारी ची कोंबिंग ऑपरेशन दरम्यान कारवाई.

बालिका

12 लाख 98 हजार रुपयांची प्रतिबंधित सुगंधित तंबाखू वाहनासह जप्त. 02 व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल. पोलीस ठाणे किल्लारी ची कोंबिंग ऑपरेशन दरम्यान कारवाई.

या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, पोलीस अधीक्षक श्री. सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, यांचे मार्गदर्शनात 06 जून ते 07 जून मध्यरात्री दरम्यान संपूर्ण लातूर जिल्ह्यात नाकाबंदी व कोंबिंग ऑपरेशनचे आयोजन करण्यात आले होते.

त्या अनुषंगाने पोलीस ठाणे किल्लारी हद्दीमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल शहाणे हे कोंबिंग ऑपरेशन राबवीत असताना दिनांक 06 जून ते 07 जून रोजी मध्यरात्री एका वाहनातून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेले अन्नपदार्थ तंबाखूजन्य पदार्थाची अवैध विक्री व्यवसाय करण्यासाठी दोन इसम प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची पिकअप वाहतूक करीत आहेत अशी माहिती मिळाली. पोलीस ठाणे किल्लारीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल शहाणे यांनी पथकासह नाकाबंदी पॉईंटला अलर्ट करून रात्री 1 वाजण्याच्या सुमारास महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्यामध्ये विक्री, वाहतूक, साठवणूक साठी प्रतिबंधित केलेला 09 लाख 48 हजार रुपयांची एक्स्ट्रा सुगंधित तंबाखू, ओपल सुगंधी तंबाखू, रत्ना 3000 सुगंधी तंबाखू अशा प्रकारच्या वेगवेगळ्यानावाच्या सुगंधित तंबाखूचा मुद्देमाल चे वाहतूक करीत असताना 03 लाख 50 हजार रुपये किमतीचे पिकअप वाहन क्रमांक एम. एच.25 ए.जे.9044 सह ताब्यात घेण्यात आला.

प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची अवैधरित्या वाहतूक करीत असताना मिळून आलेले इसम नामे

1) दिनेश नवनाथ कांबळे, वय 40 वर्ष, राहणार दहिफळ तालुका कळंब जिल्हा धाराशिव.

2) अशोक विठ्ठल कदम, वय 60 वर्ष, राहणार दहिफळ तालुका कळंब जिल्हा धाराशिव

याचे विरुद्ध पोलीस ठाणे किल्लारी येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी औसा कुमार चौधरी यांचे मार्गदर्शनात, पोलीस ठाणे किल्लारीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल शहाणे, पोलीस उपनिरीक्षक शिंदे, पोलीस अंमलदार बालाजी लटुरे, येरनवाड, होमगार्ड राठोड, सरवदे, यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??