हातभट्टी दारू तयार करणाऱ्या अड्ड्यावर, देशी-विदेशी दारूची अवैध विक्री करणाऱ्यावर छापेमारी. 62 गुन्हे दाखल. 02 लाख 96 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त. लातूर पोलिसांची कारवाई.
मुख्य संपादिका बालिका निरगुडे

हातभट्टी दारू तयार करणाऱ्या अड्ड्यावर, देशी-विदेशी दारूची अवैध विक्री करणाऱ्यावर छापेमारी. 62 गुन्हे दाखल. 02 लाख 96 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त. लातूर पोलिसांची कारवाई.
लातूर जिल्ह्यातील अवैध धंद्यावर प्रभावी कारवाई करण्यासाठी पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांचे आदेशाने विशेष मोहीम राबवून अवैध धंद्यावर कार्यवाही करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून दिनांक 30/09/2025 रोजी पहाटे अचानक मासरेड चे आयोजन करून लातूर जिल्ह्यातील लपून-छपून हातभट्टी तयार करणाऱ्या व्यक्ती आणि ठिकाणावर लातूर पोलिसांकडून प्रभावी कारवाई करत हातभट्टी दारू तयार करणारे, देशी-विदेशी दारूची अवैध विक्री व्यवसाय करणाऱ्या 63 लोकांवर 62 गुन्हे दाखल करून 02 लाख 96 हजार 710 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून हातभट्टी दारू आणि हातभट्टीचे रसायन मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे.
अवैध धंद्यावर कार्यवाही
करण्यासाठी जिल्यातील 36 पोलीस अधिकारी, 161 पोलीस अमलदारांचे विशेष पथके बनवून राबविण्यात आलेल्या मासरेड मध्ये लातूर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील दुर्गम भागात लपून- छपून हातभट्टी तयार करून त्याची साठवणूक व विक्री करणाऱ्यावर तसेच देशी-विदेशी मद्याची अवैद्य विक्री व्यवसाय करणारे 63 इसमावर 62 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये हातभट्टी,हातभट्टीचे रसायन नष्ट करण्यात आले आहे.
अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी लातूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे सूचना व मार्गदर्शनात लातूर पोलिसा कडून अवैध धंद्याविरुद्ध जोरदार कारवाई करण्यात येत असून सदरची कारवाई यापुढेही सुरूच राहणार आहे