ताज्या घडामोडी

धाराशिव न्यूज:रस्ता अपघातात गुरनं 218/2025 दाखल करण्यात आला आहे.”

धाराशिव न्यूज:रस्ता अपघातात गुरनं 218/2025 दाखल करण्यात आला आहे.”

येरमाळा पोलीस ठाणे; मयत नामे- पोलीस हवालदार श्रीराम इराप्पा कांबळे, वय 57 वर्षे, नेमणुक पोलीस मुख्यालय धाराशिव रा. एक्कुरगा ता. कळंब जि. धाराशिव ह.मु. अक्षय मेटल. MIDC, शिंगोली रेस्ट हाउस च्या जवळ धाराशिव ता.जि. धाराशिव व सोबत फिर्यादी नामे विशाल रमेश गायकवाड, वय 40 वर्षे, पोलीस हावलदार नेमणूक पोलीस ठाणे येरमाळा ता. कळंब जि. धाराशिव हे सरकारी गाडी फोर्स लाईट व्हॅनक्र एमएच 25 एएल 0856 ने चालक GPSI/178 ने पेट्रोलिंग करत असताना दि. 07.08.2025 रोजी 02.30 वा. सु. एनएच 52 रोडवर चोराखळ पाटीपासून साधारण 300 मीटर अंतरावर चोराखळी शिवार येथे पेट्रोलिंग दरम्यान वाहने चेक करत असताना ट्रक क्र एचआर 38 एई 7239 चा चालकाने त्याचे ताब्यातील ट्रक हा हायगयी व निष्काळजीपणे चालवून फिर्यादीची पेट्रोलिंग वाहन रोडच्या खाली उभी असताना पेट्रोलिंग वाहनाला पाठीमागून धडक दिली. या अपघातात पोलीस हवालदार श्रीराम कांबळे हे उपचार दरम्यान शासकीय रुग्णालय धाराशिव येथे मयत झाले. तर GPSI/178 जखमी नामे-दिनकर जाधवर व फिर्यादी विलास गायकवाड इतर इसम हे जखमी झाले. तर नमुद ट्रक चालकाने जखमीस उपचार कामी घेवून न जाता अपघाताची माहिती न देता पळून गेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-विशाल गायकवाड यांनी दि.07.08.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन येरमाळा पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 281, 106(1), 125(ए), 125 (ब) सह 184, 134 (अ) (ब) मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??