शाळेत जाणाऱ्या मुलीचा पाठलाग करून विनयभंग करणाऱ्या दोन आरोपींना 06 महिन्याचा करावास व 05 हजार रुपयांचा दंडाची शिक्षा. न्यायालयाचा निकाल.
मुख्य संपादिका बालिका

शाळेत जाणाऱ्या मुलीचा पाठलाग करून विनयभंग करणाऱ्या दोन आरोपींना 06 महिन्याचा करावास व 05 हजार रुपयांचा दंडाची शिक्षा. न्यायालयाचा निकाल.
याबाबत अधिक माहिती अशी की, सन 2022 मध्ये पोलीस ठाणे मुरुड हद्दीमध्ये सदर गुन्ह्यातील फिर्यादीच्या दोन मुली रस्त्यावरून शाळेला व ट्युशनला जात येत असताना नेहमी पाठलाग करीत असले बाबत गुन्ह्यातील आरोपी नामे
1) अशोक शिवाजी अडसुळे, वय 31 वर्ष, राहणार बोरगाव काळे तालुका जिल्हा लातूर.
2) बाळू उर्फ विजय भागवत लोहार, वय 34 वर्ष, राहणार बोरगाव काळे तालुका जिल्हा लातूर.
यांचे विरोधात पोलीस ठाणे मुरुड येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. वरिष्ठांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी, पोलीस ठाणे मुरुडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक उजगरे यांनी सदर गुन्ह्याचा बारकाईने तपास करून आरोपी विरुद्ध पुरावे जमा करून दोषारोपपत्र मा. न्यायालयात दाखल करण्यात आले होते.
त्यावर लातूर येथील मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाने सदर प्रकरणात कलम 354 (ड) भादंवी प्रमाणे आरोपींना दोषी ठरवून त्यांना सहा महिने कारावास व प्रत्येकी रु. 5000/- दंड ठोठावला आहे.सदर गुन्ह्याच्या तपास अधिकाऱ्यांनी अतिशय उत्कृष्टरित्या गुन्ह्याचा तपास करून आरोपी विरुद्ध भरपूर पुरावा हस्तगत करून मा. न्यायालयात दोषारोपपत्र सादर करून आरोपींना शिक्षा घडवून आणली आहे. सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनात उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील गोसावी, सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक उजगरे व मदतनीस पोलिस अंमलदार तसेच कोर्ट ट्रायल मॉनिटरिंग सेलचे पोलीस उपनिरीक्षक रोहन पाटील, कोर्ट पैरवी अमलदार इम्रान शेख, कोर्ट ड्युटी महिला पोलीस अंमलदार प्रेमला सगर यांनी मदत केली.