येरवडा पोलीस स्टेशन तपास पथकाने शोधून मिळालेला ऐवज केला परत
मुख्य संपादक बालिका Nirgude

येरवडा पोलीस स्टेशन तपास पथकाने शोधून मिळालेला ऐवज केला परत
दि. 19/05/25 रोजी दुपारी 12.15 वा चे सुमारास महिला नामे सुहासिनी धोत्रे वय 45 वर्षे राहणार लोहगाव पुणे हया विश्रांतवाडी चौक ते मेंटल हॉस्पीटल दरम्यान प्रवास करुन उतरल्यानंतर त्यांची बॅग रिक्षामध्ये विसरुन राहिली होती. सदर रिक्षातील बॅगमध्ये त्यांचे सव्वा तोळयाची सोन्याची चैन व 1 हजार रोख रक्कम, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, आधारकार्ड असा एकूण 1 लाख 09 हजार रु. किंमतीचा मुद्देमाल विसरुन राहिला होता. तक्रारदार पोलीस स्टेशन येथे आल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र शेळके यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अंमलदार पोहवा किरण घुटे, तुषार खराडे, श्रीनाथ कांबळे यांनी महिलेने केलेल्या ऑनलाईन ट्रान्झेक्शनव्दारे सदर रिक्षाचालकाचा शोध घेवून तक्रारदार यांचे हरवलेली सव्वा तोळयाची सोन्याची चैन व 1 हजार रोख रक्कम असा एकूण 1 लाख 09 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल तक्रारदार यांना परत देण्यात आला आहे. सदरबाबत तक्रारदार यांनी पोलीसांचे आभार मानले आहेत.
सदरची कामगिरी श्री हिंमत जाधव साो, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-4, श्री प्रांजली सोनवणे साो सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग, श्री. रविंद्र शेळके, वपोनि येरवडा, पल्लवी मेहेर पोनि गुन्हे, श्री. विजय ठाकर, पोनि गुन्हे, येरवडा यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी सपोनि रविकांत नंदनवार, सपोनि दिनेश पाटिल, श्रेणी पोउपनि प्रदिप सुर्वे, पोहवा तुषार खराडे, किरण घुटे, सागर जगदाळे, सचिन गवळी, पोअं अमोल गायकवाड, विशाल निलख, नटराज सुतार, विजय अडकमोल, बालाजी सोगे, भीमराव कांबळे, संदिप जायभाये, शैलेश वाबळे, नवनाथ गांगुर्डेे यांनी केलेली आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक
येरवडा पोलीस स्टेशन
पुणे शहर