लातूरसह नांदेड जिल्ह्यातून चोरी केलेल्या 08 मोटारसायकलीसह दोन आरोपीना अटक. 08 गुन्हे उघड. स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी.
मुख्य संपादिका बालिका निरदुडे

लातूरसह नांदेड जिल्ह्यातून चोरी केलेल्या 08 मोटारसायकलीसह दोन आरोपीना अटक. 08 गुन्हे उघड. स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी.
या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, पोलीस अधीक्षक श्री. सोमय मुंडे यांचे आदेशान्वये अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनला घडलेले मालाविषयक गुन्हे उघडकीस आणण्याकरिता पोलीस अधिकारी व अंमलदार यांना सूचना व मार्गदर्शन करण्यात आले होते.
पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या विशेषतः मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याकरिता विशेष पथके स्थापन करून गुन्हे उघड करण्याचे प्रयत्न सुरू होते.
त्या अनुषंगाने सदर पथके माहितीचे संकलन करीत असताना, माहिती घेत असताना दिनांक 03/06/2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळाली की, काहीजण शिरूर ताजबंद ते मुखेड जाणारे रोडवरील बायपास ब्रिजच्या खाली थांबून संशयितरित्या मोटरसायकली चा खरेदी-विक्री व्यवहार करीत आहेत. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने दिनांक 03/06/2025 रोजी सदर पथक तात्काळ शिरूर ताजबंद ते मुखेड जाणारे बायपास रोडच्या परिसरात पोचून चोरीच्या मोटारसायकलीसह थांबलेल्या इसमांना ताब्यात घेऊन त्यांच्या कडील मोटारसायकल संदर्भानेघेऊन त्यांच्या कडील मोटारसायकल संदर्भाने विचारपूस केली असता त्यांनी त्यांनी त्यांचे नाव
1) इम्रान गौस सय्यद, वय 22 वर्ष, राहणार विष्णुपुरी, नांदेड
2) विठ्ठल महादेव गायकवाड, वय 19 वर्ष, राहणार पांगरी नांदेड.
असे असल्याचे सांगून त्यांनी इतर साथीदार नामे
3) मनोज नागनाथ बोडके, राहणार आरळी तालुका बिलोली जिल्हा नांदेड, सध्या राहणार जयभीम नगर, नांदेड. (फरार)
अशांनी मिळून पोलीस ठाणे चाकूर हद्दीतून तसेच नांदेड जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणाहून विविध कंपनीच्या आठ मोटारसायकल चोरी केल्याचे कबूल केले आहे.
आरोपीता कडून त्यांनी चोरलेल्या 03 लाख 30 हजार रुपये किमतीच्या 08 मोटरसायकली जप्त करण्यात आले असून नमूद आरोपींना पोलीस ठाणे चाकूर येथे पुढील कार्यवाहीस्तव ताब्यात देण्यात आले आहे. संबंधित पोलीस ठाणेचे पोलीस पुढील तपास करीत आहेत.
सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक संजय भोसले यांच्या नेतृत्वातील पथका मधील पोलीस अंमलदार योगेश गायकवाड, सूर्यकांत कलमे, तुळशीराम बरुरे, पाराजी पुठेवाड, राजेशकंचे, प्रदीप स्वामी, प्रदीप चोपणे तसेच सायबर सेल येथील संतोष देवडे, गणेश साठे यांनी पार पाडली.