सोन्याचे दागिने व चार मोटरसायकलसह 2 आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात.”
मुख्य संपादिका बालिका

सोन्याचे दागिने व चार मोटरसायकलसह 2 आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात.”
मा. पोलीस अधीक्षक श्रीमती. रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती. शफकत आमना, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. विनोद इज्जपवार यांचे आदेशावरुन सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खटके, अमोल मोरे, पोह/327 जानराव, पोह/1003 वाघमारे, पोह/1479 जाधवर, पोना/1611 जाधवर, चालक पोह/1248 अरब, पोअ/693 दहीहंडे, पोअं/बोईनवाड असे धाराशिव जिल्ह्यातील मालाविषयक गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेवून मालाविषयक गुन्हे उघड व पाहिजे फरारी आरोपीचा शोथ घेणे कामी पेट्रोलींग करीता असताना पथकास गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, अनोळखी इसम हे चोरीचे दागिने व मोटरसायकल विक्री करण्याकरीता अपसिंगा रोड तुळजापूर येथे येणार आहेत अशी खात्रीलायक बातमी मिळाल्यावरुन पथकाने नमुद ठिकाणी जावून नमुद इसम नामे धोंडीराम महादेव शिंगाडे, वय 42 वर्षे, रा. शिरताव ता. मान जि. सातारा अनिल हरिश्चंद्र माने, वय 33 वर्षे, रा. वासुदेव गल्ली तुळजापूर ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना ताब्यात घेवून त्यांचे कडे असलेल्या मोटरसायकली व सोन्या बाबत विचारपुस केली असता त्याने उडवाउडवीचे उत्तरे दिली त्यास अधिक विश्वासत घेवून चौकशी केली असता त्याचे ताब्यात असलेली मोटरसायकल व सोन्याचे दागिने हे तुळजापूर येथील व मोटरसायकल या धाराशिव जिल्हा, सोलापूर ग्रामीण मोहळ व सातारा म्हसवड येथुन चोरुन आणलेले असल्याचे सांगीतले. त्यावर पथकाने नमुद मोटरसायकल ताब्यात घेवून मोटरसायकल बाबत कोणत्या पोलीस ठाणे येथे गुन्हे दाखल आहे याबाबत अभिलेखाची पाहणी केली असता सदर मोटरसायकल बाबत पोलीस ठाणे धाराशिव शहर येथे गुरनं 1) 198/2025 भा.दं. वि.सं. कलम 303 (2) ढोकी गुरनं 86/2023 कलम 379 भा.दं.वि.स., 3) पो स्टे तुळजापूर गुरनं 163/2025 भा.दं. वि.सं. कलम 309(4), 4) पोस्टे मोहळ जि. सोलापूर गुरनं 180/2023 कलम 379, 5) पोस्टे म्हसवड जि. सातारा गुरनं 160/2025 कलम 303(2), प्रमाणे गुन्हे नोंद असुन दोन पंचा समक्ष आरोपी नामे धोंडीराम महादेव शिंगाडे, वय 42 वर्षे, रा. शिरताव ता. मान जि. सातारा अनिल हरिश्चंद्र माने, वय 33 वर्षे, रा. वासुदेव गल्ली तुळजापूर ता. तुळजापूर जि. धाराशिव यांचे ताब्या तुन नमुद गुन्ह्यातील 4 मोटरसायकल व साडे पाच ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने एकुण 1,75,000 ₹ किंमतीचा माल जप्त करुन पुढील कार्यवाही कामी गुन्ह्यातील मुद्देमालासह आरोपीस तुळजापूर पोलीसांच्या ताब्यात दिले.
सदरची कामगीरी मा. पोलीस अधीक्षक श्रीमती. रितु खोखर व मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांचे मार्गदर्शनाखाली सथानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खटके, अमोल मोरे, पोह/327 जानराव, पोह/1003 समाधान वाघमारे, पोह/1479 जाधवर, पोना/1611 जाथवर, पोअं 1029 कोळी, चालक पोड़ 1248 अरब, पोअं/693 दहीहंडे, पोअ/बोईनवाड यांच्या पथकाने केली आहे.