अट्टल सोनसाखळी चोर गजाआड !२० ग्रॅम वजनाचे एक मिनी गंठण त्यास दोन बाट्या असे एकुण १,००,०००/-रु किमतीचा मुद्देमाल जप्त”
मुख्य संपादिका बालिका निरगुडे

अट्टल सोनसाखळी चोर गजाआड !२० ग्रॅम वजनाचे एक मिनी गंठण त्यास दोन बाट्या असे एकुण १,००,०००/-रु किमतीचा मुद्देमाल जप्त”
मा. पोलीस आयुक्त श्री. अमितेशकुमार साो. मा. अप्पर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर श्री. मनोज पाटील साो., मा.पोलीस उप आयुक्त, परीमंडळ ०४ श्री. सोमय मुंडे साो., मा. सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग श्रीमती प्राजंली सोनवणे सो. व वरीष्ठ पोलीस निरीक्षक वाघोली पोलीस स्टेशन पुणे शहर युवराज हांडे यांचे मार्गदर्शनाखाली, दिनांक ००६/०४/२०२५ रोजी ०८/५० या सुमारास मौजे केरानंद थेऊर रोड, पाटील वस्ती ता. हवेली जि पुणे येथून फिर्यादी यांचे गणेश किराणा स्टोअर नावाचे दुकानात दोन आनोळखी इसम मोटारसायकलवर येवून त्यातील एक जण हॉटेलमधील कांउटवरजवळ आला व बिस्किट, चॉकलेट मागण्याचा बहाण्याने फिर्यादी यांचे २० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनी गंठण व त्यास दोन वाट्या असे जबरदस्तीने हिस्कावून चोरी करून घेवुन गेले होते त्याबाबत वाघोली पोलीस स्टेशन गु रजि.नं.११५/२०२५ भारतीय न्याय संहीता कलम ३०९ (४). ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल आहे. मा वरीष्ठ पोलीस निरीक्षक सो वाघोली मो-स्टे पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली वाघोली पोलीस स्टेशन कढील तपासी अधिकारी वैजिनाथ केदार पोलीस उप-निरीक्षक, पोलीस अंमलदार/१०४३० महादेव कुंभार, पोलीस अंमलदार/४६७५ संतोष शेरखाने, पोलीस अंमलदार /८७०७ मारुती वाघमारे, पोलीस अंमलदार/८६६६ अमोल सरतापे, पोलीस अंमलदार/१०६४२ गहिनीनाथ बोयणे यांनी तसेच पोलीस अंमलदार/ २६०८ विशाल गायकवाड यांचे तांत्रिक विश्लेषण द्वारे दाखल गुन्ह्यातील आरोपी नामे मारुती ऊर्फ गोविंद रामनाथ आंधळे वय-३८ वर्षे रा.मु. लिंबोडी पोस्ट देवी निमगाव ता. आष्टी जि. बीड यास दाखल गुन्ह्यामध्ये अटक करुन आरोपीकडुन १ लाख रु किंमतीचे २० ग्रॅम वजनाच्या सोन्याचे मिनी गंठण त्यास दोन नाटचा असे एकुण १,००,०००/-रु किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कामगीरी मा अमितेशकुमार सो, पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा मनोज पाटील सो अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, मा सोमग मुंडे सो, पोलीस उप आयुक्त सो, परीमळळ ४. पुणे शहर, मा.प्रांजली सोनवणे सहा. पोलीस आयुक्त सो, येरवडा विभाग पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली मा युवराज हांडे साो, वरीष्ठ पोलीस निरीक्षक वाघोली पोलीस ठाणे, पोउपनि वैजीनाथ केदार, पोशि/१०४३७ महादेव कुंभार, पोशि/२६०८ विशाल गायकवाड, पोशि/८६६६ अमील सरतापे, पीशि/४६०५ संतोष शेरखाने, पोशि/१०६४२ गहिणीनाथ बीयणे पोशि/८७०७ मारुती वाघमारे यांनी केली आहे.