क्राईम न्युज

चंदनाच्या झाडांची अवैध तोड व वाहतुक . 68 किलो चंदन, वाहनासह 11 लाख 22 हजाराचा मुद्देमाल जप्त. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.

मुख्य संपादक बालिका निरदुडे

Sahyadri news live online portal

चंदनाच्या झाडांची अवैध तोड व वाहतुक . 68 किलो चंदन, वाहनासह 11 लाख 22 हजाराचा मुद्देमाल जप्त. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.

Sahyadri news live

या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, पोलीस अधीक्षक श्री. सोमय मुंडे यांनी अवैध धंद्यावर कार्यवाही करण्याकरिता सुचित केले आहे. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाला दि. 18 डिसेंबर ते 19 डिसेंबर रोजी मध्यरात्री पथकाला मिळालेल्या माहितीवरून आष्टामोड परिसरात चंदनाच्या लाकडाची अवैध वाहतूक करणाऱ्या लहान टेम्पोला पकडण्यात आले.

सदरच्या लेलँड कंपनीच्या दोस्त टेम्पो च्या संरचनेत फेरबदल करून एक गोपनीय कप्पा तयार करून त्यामध्ये प्रतिबंधीत व संरक्षित चंदन वृक्षाची लाकुड चोरी करुन चोरटी विक्री करण्यासाठी घेवुन असताना सदर पथकाने सापळा लावून सदरचा लेलँड कंपनीचा दोस्त टेम्पो क्रमांक एम एच 44 यू 3306 ची पाहणी केली असता त्यामधील गोपनीय कप्यामध्ये वृक्षतोड करण्यासाठी प्रतिबंधित व संरक्षित चंदनाची साल काढून तसलेला चंदनाचा गाभा व लाकडे मिळून आली.

सदरचे वाहन चालविणारे चालक व मालक हे अंधाराच्या फायदा घेऊन प्रसार झाले
सदरचे वाहन चालविणारे चालक व मालक हे अंधाराच्या फायदा घेऊन प्रसार झाले असून नमूद आरोपींना निष्पन्न करून त्यांना ताब्यात घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.

पळून गेलेल्या आरोपी च्या ताब्यातील वाहनांमधून 68 किलो चंदन, लेलँड कंपनीचे दोस्त नावाचे टेम्पो असा एकूण 11 लाख 22 हजार 800 रुपयेचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

पोलीस ठाणे चाकूर येथे नमूद आरोपी विरुद्ध कलम 41,42 भारतीय वन अधिनियम 1927 व 04 महाराष्ट्र वृक्ष तोड अधिनियम, 303(2),3 (5) भारतीय न्याय संहिता प्रमाणे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वंभर पल्लेवाड यांचे नेतृत्वात पोलीस अमलदार चंद्रकांत डांगे, रामहरी भोसले, युवराज गिरी, अर्जुन राजपूत, सिद्धेश्वर मदने, गोविंद भोसले यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??