घरफोडी चोरी करणा-या एका इसमास शिताफिने अटक करुन, तपासा दरम्यान ४,५७,२००/- रु किमंतीचा मुद्देमाल केला हस्तगत

फरासखाना पोलीस स्टेशन हद्दीत दिनांक ०३/११/२०२४ रोजी दिवसा घरफोडी चोरी झाल्यानंतर, फरासखाना पोलीस स्टेशन येथील प्रभारी श्री. प्रशांत भरगे यांनी तपास पथकातील अधिकारी वैभव गायकवाड व अरविंद शिंदे तसेच तपास पथकातील पोलीस अमंलदार यांना मार्गदर्शन व महत्वाच्या सुचना दिल्यानंतर व तपास पथकातील अधिकारी वैभव गायकवाड व अरविंद शिंदे, तसेच स्टाफ यांनी घटनास्थळाचे तसेच आरोपीने वापरलेल्या गाडीचा माग काढून, सी.सी.टी.व्ही फुटेज तसेच तांत्रिक विश्लेषन द्वारे सदरचा गुन्हा रेकॉर्ड वरील आरोपी नामे रख्यान ऊर्फ फइम शेख व त्याचे वडील असे दोघांनी लाल रंगाची बर्गमॅन गाडीवर येवुन केल्याचे प्राथमिक तपासात निदर्शनास आले.
तपास पथकातील पोलीस अमंलदार प्रविण पासलकर, गजानन सोनुने व महेश राठोड यांचे गोपनीय बातमी वरुन, दिनांक १५/११/२०२४ रोजी ढमढेरे गल्ली, बुधवार पेठ पुणे येथुन तपास पथकातील पोलीस स्टाफचे मदतीने आरोपी इसम फैय्याज राज मोहम्मद शेख रा. सत्यानंद नगर, मिठा नगर, कोंढवा खुर्द पुणे यास अटक करुन, पोलीस कस्टडी दरम्यान फरासखाना पोलीस स्टेशन कडील एक गुन्हा उघडकीस आणुन ३६ ग्रॅग वजनाचे सोन्याचे दागिने, ५०० ग्रॅग वजनाची चांदीची विट,१०० ग्रॅग वजनाचे चांदीचे दागिने, ५५,०००/- रु. रोख रक्कम, गुन्हयात वापरलेली सुझुकी (बर्गमॅन) कंपनीची गाडी, लोखंडी कटावणी असा सर्व गिळुन ४,५७,२००/-रु. किगंतीचा गुदेगाल हस्तगत करण्यात तपास पथकाला यश आले आहे. दाखल गुन्हयाचा तपास अरविंद शिंदे, पोलीस उप-निरीक्षक हे करीत आहे.
सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग श्री प्रविणकुमार पाटील, मा.पोलीस उप आयुक्त परि १ श्री. संदिपसिंह गिल, मा. सहा. पो. आयुक्त फरासखाना विमाग श्रीमती नुतन पवार, यांचे मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. प्रशांत भस्मे, पो.नि. (गुन्हे) श्री. अजित जाधव, स.पो.नि. वैभव गायकवाड, पो. उप-नि. अरविंद शिंदे, सपोफौज नेहबुब मोकाशी, पोलीस अमंलदार, प्रविण पासलकर, गजानन सोनुने, महेश राठोड, वैभव स्वामी, तानाजी नागरे, नितीन तेलंगे, संदिप कांबळे, विशाल शिंदे, किशोर शिंदे, नितीन जाधव, अर्जुन कुडाळकर, समिर माळवदकर, सुमित खुट्टे, महेश पवार, शशिकांत ननावरे, चेतन होळकर, यांनी केलेली आहे