मॉडर्न स्कुलच्या विदयार्थ्यांनी अनुभवले डायल ११२ चे महत्व
मुख्य संपादिका बालिका निरगुडे

मॉडर्न स्कुलच्या विदयार्थ्यांनी अनुभवले डायल ११२ चे महत्व
क्षेत्रीय भेट अभ्यासक्रम अंतर्गत पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर येथील आपत्कालीन प्रतिसाद पथक डायल ११२ नियंत्रण कक्ष सोलापूर शहर येथे मॉडर्न स्कुल सोलापूर येथील इ. ९ वी चे १२० विदयार्थी पोलीस आयुक्त कार्यालय येथे सदिच्छा भेट देवून डायल ११२ या आपत्कालीन हेल्पलाईन ची सविस्तर माहिती घेतली. डायल ११२ सारख्या सेवांचा नागरीकांना, विदयार्थी, विदयार्थीनींना तात्काळ अडचणीचे वेळी मदत्त कशी मिळवता येते याबद्दल मॉडर्न स्कुल सोलापूर येथील विदयार्थ्यांना सविस्तर माहिती देण्यात आली. सोबतच सायबर पोलीस ठाणे येथे सायबर फसवणुक बाबत सुध्दा माहिती देण्यात आली. याप्रसंगी पोलीस आयुक्तालयाच्या प्रांगणात एक छोटेखानी आणि प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाप्रसंगी मा. एम राजकुमार, पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांनी विदयार्थाना मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना कायदा व सुव्यवस्था पोलीसांची भुमीका, समाजिक जबाबदारी आणि डायल ११२ सारख्या सेवांचा नागरीकांना कसा उपयोग होतो याबद्दल माहिती दिली. हा उपक्रम विदयार्थ्यांसाठी माहितीपूर्ण आणि संस्मरणीय ठरला. पोलीस दलाचे कार्य जवळून अनुभवण्याची आणि आपत्कालीन परिस्थीती हाताळणाऱ्या प्रणालीबद्दल जाणुन घेण्याची संधी मिळाल्याने विदयाथ्यांमध्ये सुरक्षेची जाणिव आणि सामाजिक भान अधिक वाढल्याचे दिसुन आले.
सदर कार्यक्रमप्रसंगी, मा. पोलीस आयुक्त श्री. एम. राजकुमार, मा. श्री. गौहर हसन, पोलीस उप आयुक्त (मुख्यालय), मा. श्रीमती डॉ. अश्विनी पाटील, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), मा.श्री. विजय कबाडे, पोलीस उप आयुक्त (परीमंडळ), श्री. राजन माने, गुन्हे शाखा, नियंत्रण कक्ष, मा. श्री. उदयसिंह पाटील, पोलीस निरीक्षक (मा.सं. विकास), मा. श्री. विकास देशमुख, पोलीस निरीक्षक, नियंत्रण कक्ष, मा. श्री श्रीशैल गजा, पोलीस निरीक्षक (सायबर पोलीस ठाणे), मा. श्री. अरुण फडके, सुपरवायझर अधिकारी डायल ११२, तसेच डायल ११२ व सायबर सेल येथील पोलीस अंमलदार, मॉडर्न स्कुल चे सचिव कुलकर्णी संर, मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग, विदयार्थी, उपस्थित होते.