क्राईम न्युज

सलग ०५ दिवस १०० पेक्षा अधिक सीसीटिव्ही तपासुन पुणे शहर व परिसरात तब्बल १५० पेक्षा जास्त घरफोडीचे गुन्हे दाखल असणा-या सराईत गुन्हेगारास कोंढवा पोलीसांनी ठोकल्या बेड्या.”

मुख्य संपादिका बा लिका

सलग ०५ दिवस १०० पेक्षा अधिक सीसीटिव्ही तपासुन पुणे शहर व परिसरात तब्बल १५० पेक्षा जास्त घरफोडीचे गुन्हे दाखल असणा-या सराईत गुन्हेगारास कोंढवा पोलीसांनी ठोकल्या बेड्या.”

कोंढवा पोलीस स्टेशन हददीमध्ये दिनांक ०४/०६/२०२५ रोजी पहाटेच्या वेळी तब्चल २१ तोळे सोने चोरी करुन नेल्याची घटना घडली होती. त्या अनुषंगाने दाखल गुन्हयाच्या तपासामध्ये तपास पथक मधील अंमलदारांनी सलग ०५ दिवस जवळजवळ १०० पेक्षा अधिक सीसीटिव्ही चेक करून वेगवान व कौशल्यपुर्ण तपासकरुन चोराचा माग काढून चोरटयास जेरबंद केले आहे.

सदरबाबत अधिक माहीती अशी की, दि. ०३/०६/२०२५ रोजी दुपारी १३.०० वा ते दि. ०४/०६/२०२५ रोजी दुपारी १५.०० वा चे दरम्यान यातील फिर्यादी नामे शकुंतला राजाराम दामगुडे, वय ५९ वर्षे, व्यावसाय गृहिणी, रा. ए ४/३ कमल रेसिडन्सी, सर्वे नं.६०, सुखसागरनगर भाग ०२, कोंढवा बु पुणे यास त्यांचे राहते घराचे दरवाजास कुलूप लावून पती राजाराम दामगुडे यांच्यासह त्यांचे मुळगाची मु.पो. शिंद, ता भोर पुणे येथे अंत्यविधीकामी गेल्या असताना कोणीतरी अज्ञात इसमाने कशा चेतरी सहाय्याने त्यांचे राहतेघराचे लोखंडी दरवाजाचे तसेच लाकडी दरवाजाचे कडी-कोयंडे च कुलूप कापून त्यावाटे घरात प्रवेश करून सोन्याचे दागिने व रोख रक्कम व सोसायटी चे ऑफिस मधील सीसीटीव्हीचा डीव्हीआर असे चोरी करून नेला म्हणून कोंढवा पोलीस स्टेशन पुणे शहर येथे गु.र.नं. ४३६/२०२५, भा.न्या.सं. कलम. ३३१(३),३३१ (४),३०५ अन्यये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

दाखल गुन्हयामध्ये चोरांनी तब्बल २१ तोळे सोने चोरी करुननेले असल्याने घटनेचे गांभीर्य लक्षात घेवुन मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ०५ यांचे अधिपत्याखाली, काँढ़वा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक, श्री. विनय पाटणकर व पोलीस निरिक्षक गुन्हे श्री. नवनाथ जगताप यांचे मार्गदर्शनाखाली तपासपथक अधिकारी श्री. राकेशजाधव, पोलीस उपनिरिक्षक श्री. बालाजी डिगोळे यांचे सुचने नुसार गुन्हयाचे तपासा करीता तात्काळ दोन पथके तयार करण्यात आली. घटनेची वेळ लक्षात घेवुन सीसीटिव्हीच्या माध्यमातुन तपास चालु करण्यात आला. सलग ०५ दिवस १०० पेक्षा जास्त सीसीटिव्ही तपासुन त्याद्वारे आरोपीचा माग काढत असताना दिनांक १०/०६/२०२५ रोजी तपास पथकातील अंमलदार विकास मरगळे, राहुल थोरात, लक्ष्मण होळकर यांना त्यांचे बातमीदारां मार्फत बातमी मिळाली की, सदरची चोरी रेकॉर्ड वरील आरोपी नामे अर्जुनसिंग रजपूतसिंग दुधानी याने केलेली असुन तो ७२ नंबर वस्ती, मांजरीगाच येथील त्याचे राहते घराचे परिसरामध्ये येणार आहे. अशी खात्रीशीर माहीती मिळाल्याने तपास पथक मधिल अंमलदारांनी सदरठिकाणी सापळा लावुनत्यासशिताफिनेताब्यात घेवुनत्यासदाखलगुन्ह्यात अटककेली आहे. सदर आरोपीचे पोलीस कस्टडीरिमांड दरम्यान आरोपीकडुन १) ४० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसुत्र, २) २० ग्रॅम वजनाची सोन्याची चैन व ३) ४०,०००/- रू कि ची गुन्ह्यामध्ये वापरलेली होंडा स्प्लेंडर मोटार सायकल असा एकुण ३,४०,०००/- रू किंचा मुद्देमाल जप्त केला आहे. गुन्हयातील अटक आरोपी अर्जुनसिंग रजपुतसिंग दुधानी वय ४७ वर्षे, रा. ७२ नंबर वस्ती, पाण्याचे टाकीजवळ, मांजरीगाय, हडपसर पुणे हा घरफोडीकरणारा अटटल गुन्हेगार असुन त्याचेवर पुणे शहर व परिसरात १५० पेक्षा जास्त घरफोडी चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

वरील नमुद कारवाई ही मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ५ श्री. राजकुमार शिंदे, मा. सहा. पोलीस आयुक्त वानवडी विभाग श्री. धन्यकुमार गोडसे, मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंढवा पोलीस स्टेशन, श्री. विनय पाटणकर, मा. पोलीस निरीक्षक गुन्हे श्री. नयनाथ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली कोंडया पोलीस स्टेशन येथील तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक राकेश जाधव, पोलीस उपनिरीक्षक बालाजी डिगोळे, पोलीस अंमलदार सतिश चव्हाण, निलेश देसाई, विशाल मेमाणे, गोरखनाथ चिनके, लक्ष्मण होळकर, सुजित मदन, सुरज शुक्ला, संतोष बनसुडे, विकास मरगळे, राहूल थोरात, अभिजीत जाधव, सैफ पठाण यांच्या पथकाने केली आहे.

कोंढवा पोलीस स्टेशनतर्फे नागरिकांना आवाहन करण्यात येते की, आपले राहतेघराला उत्तम प्रतीचे सेफ्टी डोअर्स व सीसीटिव्ही बसवावेत तसेच सुरक्षा रक्षक/वॉचमन नेमावेत जेणे करुन असे अनुचित प्रकार टाळण्यास मदत होइल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??