शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंडी रॉडने मारहाण गुन्हा दाखल
मुख्य संपादिका बालिका निरदूडे

“शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंडी रॉडने मारहाण गुन्हा दाखल
धाराशिव ग्रामीण पोलीस ठाणे आरोपी नामे श्रीकांत शिंदे, पांडुरंग घुले, दोघे रा. तेरखेडा ता. वाशी, प्रशांत शिंदे, रा. साकत ता. परंडा, अविनाश मोराळे, रा. वडजी ता. वाशी, समाधान कवडे, रा. खामकरवाडी ता. वाशी जि. धाराशिव यांनी दि. 21.07.2025 रोजी सायंकाळी 16.00 वा. सु. सोलापूर ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील ब्रिजजवळ बार्शी ते लातुर रोडवर येडशी शिवार येथे फिर्यादी नामे सुरज अरुण अवधुत, वय 27 वर्षे, रा. तेरखेडा ता. वाशी जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी मिरवणुकीत धक्का लागण्याचे कारणावरुन स्कार्पिओ व थार गाडीतुन येवून फिर्यादीचे स्कार्पिओ आडवी लावून गैरकायद्याची मंडळी जमवून जिवे ठार मारण्याचे उद्देशाने शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंडी रॉडने मारहाण गंभीर जखमी केले. जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-सुरज अवधुत यांनी दि.27.07.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन पो ठाणे धाराशिव ग्रामीण येथे भा.न्या.सं. कलम 109 (1), 126(2),189(2),191(2), 191(3), 190,115(2), 352, 351(2) (3) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.