मुंबईकडे विक्रीसाठी निघालेला गांजा स्थानिक गुन्हे शाखा धाराशिव ने पकडला.”
मुख्य संपादिका बालिका निरगुडे

“मुंबईकडे विक्रीसाठी निघालेला गांजा स्थानिक गुन्हे शाखा धाराशिव ने पकडला.”
मा. पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला अमली पदार्थ विक्री करणारे व्यक्तींवर कारवाई करणे बाबत आदेशित केले होते. आज दिनांक 12.06.2025 रोजी रात्री 00.05 वा चे सुमारास स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि कासार व पथक हे धाराशिव उपविभागात गस्त करीत हॉटेल समाधान समोर ट्रॅव्हल पॉईंट येडशी ता.जी धाराशिव येथे आले असता एक इसम काळ्या रंगाच्या बॅग सह संशयितरित्या थांबलेला दिसून आला. त्यास पथकाने विश्वासात घेऊन बॅगमध्ये काय आहे असे विचारले असता त्याने बॅगमध्ये गांजा असल्याचे पोलिसांना सांगितले. त्यावरून तात्काळ पोस्टे ग्रामीण पोलिसांची मदत घेऊन पंचनामा करून सदर बॅग मधील 8.27 किलो वजनाचा 1,65,400 रुपये किंमतीचा गांजा जप्त करण्यात आला. ताब्यात घेतलेल्या इसमाचे नाव वसंत भालचंद्र शिंदे, रा. वाखरवाडी ता.जी धाराशिव असे असून तो सदरचा गांजा ढोकी येथुन ट्रॅव्हल्स द्वारे मुंबई येथे नेऊन विकणार होता अशी माहिती तपासातून प्राप्त झाली आहे. सदर इसमास पुढील कारवाई कामी पोलीस ठाणे धाराशिव ग्रामीण येथे जप्त मुद्देमालासह हजर करण्यात आले आहे. त्याचेवर पोस्टे धाराशिव ग्रामीण गु र नं 125 / 25 कलम 8 क 20 (ब) (2) (ब) एन डी पी एस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक धाराशिव श्रीमती रितु खोखर व अपर पोलीस अधीक्षक धाराशिव श्रीमती शफकत आमना यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार स्थागुश थाराशिव, पोनि मारुती शेळके पोस्टे धाराशिव ग्रामीण, सपोनि सुदर्शन कासार स्थागुशा, पोलीस उपनिरीक्षक उद्धव हाके, पोस्टे ग्रामीण हवालदार शौकत पठाण, प्रकाश औताडे, जावेद काझी फरहान पठाण स्थागुशा, पोना राजकुमार वाघमारे, पोका सुधीर भांतलवंडे, पोस्टे ग्रामीण चपोअ रत्नदीप डोंगरे, चपोअ रामलिंग बनाळे, डॉग स्कॉडचे पोहेका सुजित वडणे व संतोष शाहीर यांनी संयुक्तपणे केली आहे.