क्राईम न्युज

दरोड्याचे तयारीत असणारे आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात.”

मुख्य संपादिका बालिका निरदुडे

दरोड्याचे तयारीत असणारे आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात.”

धाराशिव जिल्ह्यातील मालाविषयक गुन्ह्यातील आरोपीची माहिती काढुन चोरीचे गुन्हे उघडकीस आणणे बाबत मा. पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती. शफकत आमना यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांचे आदेशावरून सपोनि श्री. अमोल मोरे, सपोनि श्री. सचिन खटके, पोहेकों/327 विनोद जानरव, पोहेकों/1003 वाघमारे, पोह/1479 जाथवर, पोना / 1611 जाथवर, चालक पोहेकों अरब, पोकों/दहीहांडे, बोईनवाड यांचे पचक मालाविषयक गुन्ह्यातील आरोपीची माहिती काढात पेट्रोलिंग करत असताना दि. 17.06.2025 रोजी 19.30 वाजता तेरणा कॉलेज येथे आले असता पथकास गोपनिय माहिती मिळाली की, विमनातळ कडे जाणारे रोडचे बाजूला धाराशिव येथे चार ते पाच इसम एक चार चाकी कार व तीन मोटरसायकल सह अंधारामध्ये कोठेतरी दरोडा टाकण्याचे तयारीत संशईत रित्या थांबले आहेत. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने पथकाने लागलीच माहिती मिळालेल्या ठिकाणी जावून घोड्या अंतरावर शासकीय वाहन थांबवून पायी चालत जात असताना तेथे थांबलेल्या इसमा पैकी दोन इसमांनी पथकातील कर्मचारी यांना पाहताच मोटरसायकलवर बसून पळून गेले. तेथे खाली बसलेले इतर साथीदार पळून जाण्याचे तयारीत असताना पथकाने त्यांना ताब्यात घेवून त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव- 1) धुपकिरण उर्फ अनिलशेट रामलगन चौधरी, वय 47 वर्षे, रा. अरिवला (फुलपुर) ता. भानपुर जि. बस्ती राज्य उत्तरप्रदेश, 2) निलेश उर्फ कांचन संभाजी चव्हाण, वय 32 वर्षे रा. काकानगर ता. जि. धाराशिव, 3) मुकेश शाम शिंदे, वय 24 वर्षे, रा. शिंगोली ता. जि. धाराशिव असे सागितले. पथकाने नमुद तीन आरोपीच्या ताब्यातून एक लोखंडी धातुचे गावठी बनावटीचे पिस्टल अंदाजे 75,000₹ किंमतीचे, तिन जिवंत काडतुसे अंदाजे 600₹, एक लोखंडी कोयता 200₹, एक हयुंडाई कंपनीची सेंट्रो कारअंदाजे 2,30,000₹ व एक बुलेट मोटरसायकल अंदाजे 1,55,000₹ किंमतीची व होंडा अॅक्टीवा स्कुटी अंदाजे 45,000₹ असा एकुण 5,05,800₹ किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन पोलीस ठाणे धाराशिव ग्रामीण वेथे नमुद आरोपीविरुध्द गुन्हा दाखल करुन नमुद 3 आरोपीस मालासह धाराशिव ग्रामीण पोलीसांच्या ताब्यात दिले.

सदरची कामगीरी मा. पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर व मा. श्रीमती. शफकत आमना. यांचे मार्गदर्शनाखाली सथानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. अमोल मोरे, श्री सचिन खटके, पोहेकों विनोद जानराव, समाधान वाघमारे, नितीन जाधवर, पोलीस नाईक बबन जाधवर, चालक पोहेकों महेबुब अरब, पोकों/विनायक दहीहांडे, पोकों/प्रकाश बोईनवाड यांच्या पथकाने केली आहे.

जनसंपर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??