क्राईम न्युज

मावळ तालुक्यातील प्रसिध्द बैलगाडा मालक श्री पंडीत जाधव यांचे अपहरण करून खून केला व त्यांचा मृतदेह जाळून त्याची विल्हेवाट लावुन खंडणीचा बनाव करणाऱ्या आरोपीस ताब्यात घेवून गुन्हा उघड केलेबाबत..

मुख्य संपादक बालिका निरदुडे

Sahyadri news online portal

खंडणी विरोधी व औद्योगिक तक्रारी निवारण पथक, गुन्हे शाखेची कामगिरी मावळ तालुक्यातील प्रसिध्द बैलगाडा मालक श्री पंडीत जाधव यांचे अपहरण करून खून केला व त्यांचा मृतदेह जाळून त्याची विल्हेवाट लावुन खंडणीचा बनाव करणाऱ्या आरोपीस ताब्यात घेवून गुन्हा उघड केलेबाबत..

वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. देवेंद्र चव्हाण यांना त्यांचे बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतून इसम नामे श्री पंडीत रामचंद्र जाधव व्य-५२ वर्षे रा. मु.जाधववाडी डॅमजवळ, पो. नवलाख उंब्रे ता. मावळ, जि. पुणे हे दिनांक १४/११/२०२४ रोजी पासून बेपत्ता असून, अज्ञात इसम त्याचे नातेवाईकांकडे पंडीत जाधव यांचे व्हाटसअॅपवर नंबरचा वापर करुन त्यांचे नातेवाईकांकडे ५० लाख रुपयाची मागणी करत आहे. सदरची माहिती प्राप्त झाल्याने, त्याबाबत वरिष्ठ अधिकारी यांना कळवून मा. वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री देवेंद्र चव्हाण, पोलीस उप-निरीक्षक सुनिल मदाणे व त्यांचेकडील स्टाफ असे तळेगाव एमआयडीसी परीसरात जावून, तक्रारदार व त्यांचे नातेवाईक यांना भेटून, त्यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी इसम हा पंडीत जाधव यांच्या मोबाईलचा व्हाटसअॅपवरुन पैश्याची मागणी करत होता. श्री पंडीत जाधव यांचे बंद मोबाईल नंबरचे तांत्रिक विश्लेषण करून तसेच परीसरातील सिसिटीव्ही चेक केले व तसेच बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरून सूरज वानखेडे यांच्या हालचाली संशयास्पद असल्याची माहिती प्राप्त झाली. गुन्हयातील आरोपी याचे नाव निष्पन्न करुन आरोपी नामे सुरज मच्छिंद्र वानखेडे, वय २३ वर्षे सध्या रा. पंडीत जाधव यांचे खोलीत, मु, जाधववाडी, पोस्ट-नवलाख उंबे, ता. मावळ, जि. पुणे यास तो गावी पळून जाण्याच्या तयारीत असताना बधलवाडी, नवलाख उन्ने ता मावळ जि पुणे येथून ताब्यात घेवून, त्याचेकडे केलेल्या चौकशीवरुन त्यास विश्वासात घेवून त्याने तो व त्याचा मित्र रणजीत कुमार रा बिहार याच्या मदतीने प्रसिध्द गाडा मालक पंडीत रामचंद्र जाधव वय-५२ वर्षे यांचे ५० लाख रुपयाची खंडणी मागीतल्याचा बनाव करुन अपहरण केले व त्यांचा दि. १४/११/२०२४ रोजी राजी तळेगाव एमआयडीसी परीसरात वैयक्तीक कारणावरून दोरीने गळा आवळून खुन केला. मयत यांची फॉर्चुनरगाडी ही मयत यांनी मागीतली असल्याचे त्यांचे कुटुंबीयांना भासवुन त्याच गाडीमध्ये मयत यांचा मृतदेह टाकुन त्यांचे मृतदेहावा वहागाव ता. खेड जि. पुणे येथील डोंगरावर मृतदेह जाळुन त्याची विल्हेवाट लावली व गाडी पुन्हा मयत इसमाचे घराचे परीसरात लावल्याचा तपासात निष्पन्न झाल्याने खंडणी विरोधी पथकाकडून गंभीर स्वरुपाचा गुन्हा उघड करण्यात आला असुन आरोपीकडुन गुन्हयात वापरलेले पाच सिमकार्ड व दोन मोबाईल जप्त करण्यात आले आहे. नमुद गुन्हयात खुन करुन पुरावा नष्ट करणे याप्रमाणे कलमचाढ करण्यात आली असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास तळेगांव एमआयडीसी पोलीस ठाणे करत आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त श्री. विनय कुमार चौबे, मा. पोलीरा राह-आयुक्त, डॉ. शशिकांत महावरकर, मा. अपर पोलीस आयुक्त, श्री. वसंत परदेशी, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, श्री. संदिप डोईफोडे, राहा. पोलीस आयुक्त, गुन्हे-२, श्री. बाळासाहेब कोपनर, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे-१, डॉ. विशाल हिरे यांचे मार्गदर्शनाखाली, खंडणी विरोधी व औद्योगिक तक्रारी निवारण पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, पोउपनि सुनिल भदाणे, पोलीस हया सुनिल कानगुडे, प्रदिप पोटे, किरण काटकर, प्रदिप गोंडावे, किशोर कांबळे, किरण जाधव, अशिष बोटके, चंद्रकांत जाधव, प तांत्रिक विश्लेषन विभागाचे श्री नागेश माळी व पोपट हुलगे यांचे पथकाने केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??