
अवैध मद्य विरोधी ढोकी पोलीसांची कारवाई.”
मा. पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आगना यांच्या मार्गदर्शनाखाली आज रविवार दि. 15.06.2025 रोजी ढोकी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी विलास हजारे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, तावरजखेडा येथील लमाण तांडा येथे गावठी हातभट्टी दारु गाळण्याच्या भट्टया सुरु आहेत. अशी माहिती मिळाल्याने सदर बातमीची हकिकत मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. संजय पवार, उपविभाग कळंब यांना माहिती देवून त्यांचे आदेशाप्रमाणे पथक तयार करुन सदर ठिकाणी जावून बातमीची खात्री करुन छापा मारला असता. तावरजखेडा लमाण तांडा येथील इसम नामे पार्वती शंकर चव्हाण, शाहुबाई बालाजी जाधव, कार्तिक शंकर चव्हाण, वसंत लालसिंग राठोड, संजय विनायक पवार, नागनाथ किसन राठोड, निलावती व्यंकट पवार, कलावती मधुकर पवार, सर्व रा. तावरजखेडा ता. जि. धाराशिव हे यांचेकडून 9,200 लिटर गावठी दारु निर्मीतीचा आंबवलेले गुळमिश्रीत रासायनिक द्रव जप्त करण्यात आला. सदरचा गावठी दारु निर्मीतीचा आंबवलेले गुळमिश्रीत रासायनिक द्रव हा नाशवंत असल्याने तो जागीज ओतुन नाश करण्यात आला. सदर ओतुन दिलेला मद्यार्क निर्मीतीचा द्रवपदार्थासह महानिर्मीती साहित्य व जप्त मद्य यांची एकत्रित किंमत 6,30,000₹ असुन वरील नमुद आरोपी यांचे विरुश्द ढोकी पोलीस स्टेशन येथे गुरनं 179/2025,180/2025 कलम 65 (फ) महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कायद्याप्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आगना यांच्या मार्गदर्शनाखाली मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. संजय पवार, सहायक पोलीस निरीक्षक श्री. विलास हजारे, परिविक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक प्रमोद जगताप, किशोर माळी, पोलीस अंमलदार सपोफौ सातपुते, पिकों कळसाईन, पोकों पटाडे, शिंदे, थाटकर, चालक पोहेकों गुंड, पोकों साखरे यांचे पथकाने केली आहे.