आळंदी पो स्टे कडील खुनाचा गुन्हा 4 तासामध्ये उघड करून 02 ही आरोपी अटक केल्या बाबत…..
मुख्य संपादिका बालिका निरगुडे

आळंदी पो स्टे कडील खुनाचा गुन्हा 4 तासामध्ये उघड करून 02 ही आरोपी अटक केल्या बाबत…..
आळंदी पो स्टे हद्दी मधील आळंदी-मरकाळ रोड लगत धनोरे येथे एका ३५ वर्ष अनोळखी इसमाचा मृतदेह आज सकाळी ०८/०० वाजता मिळून आला होता. त्याच्या तोंडावर मोठ्या दगडाने मारुन त्याचा खून करण्यात आला होता.
त्यावरून आळंदी तपास पथकाने मयत याची ओळख पटवली असता तो प्रकाश विठोबा भुते वय ३९ वर्ष रा विकासवाडी, धनोरे हा असल्याचे निष्पन्न झाले.
त्यांनतर घटनास्थळ व परिसरातील CCTV कॅमेरे तपासून व इतर तांत्रिक तपास करून गुन्ह्यातील आरोपी कुंडलिक न्यानदेव काळे वय २१ वर्ष रा चारोळी खुर्द मूळ रा वाशीम व एक विधी संघर्षित बालक याना निष्पन्न करून त्याचा शोध घेऊन दोन्ही आरोपीना 4 तासामध्ये ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच गुन्हा करताना वापरलेली दुचाकी व आरोपी च्या अंगावरील रक्तानी माखलेले कपडे सुद्धा आरोपी कडून जप्त करण्यात आली आहे.