पुणे! बिबवेवाडी पोलिसांनी आरोपींना सापळा रचून पकडले अन् काढली वरात

पुणे! बिबवेवाडी पोलिसांनी आरोपींना सापळा रचून पकडले अन् काढली वरात
पुणेः पुणे शहरातील बिबवेवाडी हद्दीमध्ये दहशत पसरवून गंभीर जखमी करणाऱ्या आरोपींची त्याच परिसरात पोलिसांनी वरात काढली. यावेळी पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक करत नागरिकांनी पोलिसांचे अभिनंदन केले आहे.
अधिक माहिती अशी की, बिबवेवाडी पोलिस स्टेशन गुन्हा रजि. नं. ९४ / २०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ११८(२), ३०९ (६), ३५२, ११५ (२), ३ (५) क्रिमिनल लॉ अमेटमेन्ट ३,७भारतीय हत्यारा कलम ४ (२५), महा. पोलिस अधिनियम ३७ (१) सह १३५ मधील फिर्यादी अशोक प्रकाश देवडा (वय २७ वर्षे धदा व्यवसाय स नं ६४८/ ७ त्रिमुर्तीनगर न्यु पदमावतीनगर म्हसोबा मंदिर शेजारी अप्पर बिबवेवाडी पुणे) यांना आरोपी १) प्रकाश सिद्धाप्पा सोनकांबळे (वय- २० वर्षे, रा. पद्मावती नगर, बिबवेवाडी पुणे), २) अहमद शब्बीर शेख (वय २० वर्षे, रा. पर्वती पायथा, दत्तवाडी पुणे) यांनी काहीएक कारण नसताना फिर्यादी यांना अप्पर डेपो जवळ भुतबंगला रोड, बिबवेवाडी पुणे येथे फिर्यादी यांचे डोक्यात दगडाने व हातावर धारधार शस्त्राने वार करुन गंभीर जखमी केले. शस्त्र हवेत फिरवत दहशत माजवून निघून गेल्याने वरीलप्रमाणे गुन्हा दाखल आहे.दाखल गुन्ह्यातील आरोपी गुन्हा केलेपासून फरार होते. आरोपी प्रकाश सोनकांबळे हा अतिषय चालाक व रेकॉर्डवरील असल्याने तो पोलिसांचे डावपेच ओळखून होता. आरोपी आपली ओळख लपवून वावरत होते. बिबवेवाडी पोलिस स्टेशनकडील तपास पथकातील अंमलदार त्यांचा कसून शोध घेत असताना पोलिस अंमलदार शिवाजी येवले यांना त्यांचे बातमीदारामार्फत मिळालेल्या खात्रीशिर बातमीप्रमाणे आरोपी हे त्यांच्या मैत्रिणीकडे येणार असल्यान सदर ठिकाणी पर्वती भागात सापळा रचला. आरोपींना शिताफितीने पकडण्यात आले असून त्यांना अटक करून त्यांचेकडे तपास करून त्यांनी ज्या भागात दहशत पसरवली तेथेच त्यांची व काढून लोकांमध्ये जनजागृती केली आहे.