क्राईम न्युज

धुळे येथील शिरपुर येथून गांजा तस्करी करुन पुणे शहरामध्ये विक्री करीता घेवुन जाणारा इसम ५५ किलो गांजासह ताब्यात, ३२ लाखाचा मुद्देमला जप्त”

मुख्य संपादिका बालिका निरदुडे

Sahyadri news liveonline portal

धुळे येथील शिरपुर येथून गांजा तस्करी करुन पुणे शहरामध्ये विक्री करीता घेवुन जाणारा इसम ५५ किलो गांजासह ताब्यात, ३२ लाखाचा मुद्देमला जप्त”

Sahyadri news network

Cif editor Balika nirdude

पिंपरी चिंचवड:-मा. पोलीस आयुक्त श्री विनयकुमार चौबे यांनी पिंपरी चिंचवड शहरामध्ये अंमली पदार्थांचे अवैध विक्रीवर आळा घालणे करीता व अंमली पदार्थाचे समुळ उच्चाटन करणेबाबत आदेशीत केले आहे.

मा पोलीस उप आयुक्त, गुन्हे संदिप डोईफोडे, मा सहा पोलीस आयुक्त, गुन्हे २. बाळासाहेब कोपनर यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखे कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक,

संतोष पाटील यांनी अंमली पदार्थ विरोधी पथकातील सहा पोलीस निरीक्षक सचिन कदम, विक्रम गायकवाड, पोउपनि ज्ञानेश्वर दळवी व पोलीस अंमलदार यांची वेगवेगळी पथके तयार करुन विधानसभा निवडणुकीचे अनुशंगाने पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे हद्दीत कोणत्याही प्रकारचे अंमली पदार्थाचे अवैध विक्रीवर आळा घालणे करीता व अंमली पदार्थाचे समूळ उच्चाटन करणेबाबत आदेशीत केले. वपोनि संतोष पाटील, सपोनि विक्रम गायकवाड व पथक हे दिघी आळंदी परीसरात रात्री संशयीत वाहन चेकिंग करीत असताना पोलीस अंमलदार विजय दौंडकर व गणेश कर्पे यांना आळंदी घाट येथुन एक मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर गाडी दिधीचे दिशेने भरधाव येताना दिसली. त्यांनी ती थांबवुन गाडी चालविणारा इसम नामे नुरमोहम्मद गफ्फार पिंजारी, वय ४५ वर्षे, रा वडाला गाव, मदिना नगर, मदिना मस्जिद सगोर, ता जि नाशिक याचेकडे चौकशी केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देवू लागला. त्याचे वागण्याचा संशय आल्याने त्याचेकडील चारचाकी गाडीची तपासणी केली असता गाडीचे डिकीमध्ये एक पांढरे रंगाचे नायलॉनचे पोते मिळुन आले. त्या पोत्यामध्ये एकुण ५५ किलो ६९० ग्रॅम गांजा हा अंमली पदार्थ मिळुन आला.

इसम नामे नुरमोहम्मद गफ्फार पिंजारी याचे ताब्यातुन एकुण ३२,९५,५००/- किंमतीचा माल ज्यामध्ये ५५,६९० ग्रॅम गांजा हा अंमली पदार्थ, एक पांढरे रंगाची एम.एच.१४/सी.एस./११५० असा क्रमांक असलेली मारुती सुझुकी स्विफ्ट डीझायर गाडी व ०२ मोबाईल जप्त करुन त्याचेविरुध्द दिधी पोलीस स्टेशन येथे गु.र.क्र. ५२०/२०२४ एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २० (ब) (ii) (क), २९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हयाचा तपास दिघी पोलीस स्टेशन हे करीत आहेत.

सदरची कारवाई मा. विनयकुमार चौबे, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड आयुक्तालय, मा. शशिकांत महावरकर, सह पोलीस आयुक्त, गा. वसंत परदेशी, अपर पोलीस आयुक्त, मा. संदिप डोईफोडे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, गा. विशाल हिरे, सहा पोलीस आयुक्त, गुन्हे १, मा. बाळासाहेब कोपनर, सहा पोलीस आयुक्त, गुन्हे २ यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील, सहा पोलीस निरीक्षक विक्रम गायकवाड पोलीस अंमलदार विजय दौंडकर, गणेश कर्पे, जावेद बागसिराज, मयुर वाडकर, निखिल शेटे, रणधीर माने, निखिल वर्षे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??