क्राईम न्युज

अवैध जनावरांची वाहतुक करणान्यावर गुन्हा दाखल.”

अवैध जनावरांची वाहतुक करणान्यावर गुन्हा दाखल.”

दि. 18.06.2025 रोजी 12.30 वा. सु. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, वैरागकडुन दोन आयशर मध्ये कत्तलीसाठी गायी घेवून धाराशिव कडे येत आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने वैराग रोडवरील इंडीया विटभट्टी जवळ आले असता 13.00 वा. सु. वैरागकडून एक इटकरी रंगाचा आयशर येताना दिसल्याने पथकाने वैरागकडून येणाऱ्या वाहनास हात दाखवून त्यास धांबवून गाडीमध्ये पाहिले असता सदर वाहनात एकुण 14 काळ्या पांढऱ्या रंगाच्या जीं गायी मिळून आल्याने पथकाने चालकास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव- इरशाद कमाल नदाफ, वय 31 वर्षे, रा. जुना बाजार तळ, अकलुज ता. माळशिरस जि. सोलापूर असे सागिंतले. सदर आयशर वाहनाचा पासिंग नं एमएच 45 0927 असा दिसला. त्यावेळी वैरगाकडून पाठीमागून एक निळ्या रंगाचा आयशर येताना दिसल्याने त्यास हात दाखवून रोडच्या कडेला थांबवून त्या आयशरमध्ये पाहीले असता त्यामध्ये लहान काळ्या पांढऱ्या रंगाची जीं जातीचे 26 लहान वासरे व 06 जर्शी गायी मिळून आल्याने पथकाने चालकास त्याचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नावे रामपाल दत्तात्रय खंडागळे, वय 38 वर्षे, रा. यशवंत नगर अकलुज ता. माळशिरस जि. सोलापूर असे सागिंतले. तसेच निळ्या रंगाचे आयशरचा पासिंग नंबर एमएच 12 एआर9425 असा दिसला. तेव्हा दोन्ही चालकांना विचारले वासरे व गायी या कोठुन आणल्या तेव्हा त्यांनी सांगीतले की, सदरच्या गायी व लहान वासरे हे माळशिरस व नातेपुते परिसरातुन धाराशिव येथील बाबा गौस इरशाद कुरेशी यांनी विकत घेतल्या असुन त्या त्यांच्याकडे कत्तल करणेसाठी घेवून जात आहोत. यावर पथकाने नमुद आरोपी यांचे ताब्यातुन 20 गायी, 26 लहान वासरे वाहनासह एकुण 26,83,000₹ किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन नमुद आरोपी यांचे विरुध्द धाराशिव शहर पोलीस ठाणेत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदरची कामगीरी मा. पोलीस अधीक्षक, श्रीमती रितु खोखर, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती. शफकत आमना, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. विनोद इज्जपवार, पोलीस हावलदार दयानंद गादेकर, बळीराम शिंदे, नाईकवाडी व धाराशिव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस हावलदार आडगळे, पोलीस अंमलदार- कनामे यांचे पथकांनी केली आहे.

जनसंपर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??